Mumbai Metro 7 A | मुंबई मेट्रो 7 अ वरील बोगद्याचा ब्रेक थ्रू, टनेल बोरिंग मशीनद्वारे खोदकाम
मुंबई शहराच्या वेगवान वाहतुकीसाठी विण्यात येणाऱ्या मेट्रो ट्रेनच्या जाळ्यातील एक महत्त्वाचा टप्पा गुरुवारी पूर्ण झाला. मुंबई मेट्रो 7A या मार्गिकेवरील महत्त्वाचा बोगदा आज खणून पूर्ण झाला. बोगदा खणून झाल्यामुळे आता या मार्गावर ट्रॅक बसवण्याचे आणि ओव्हरहेड वायर्स लावण्याच्या कामाला सुरुवात करता येणार आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत मेट्रोची 7A (Mumbai Metro 7A) ही मार्गिका कार्यान्वित होऊ शकेल. एमएमआरडीएकडून उभारण्यात येत असलेली मुंबई मेट्रो 7A ही मार्गिका गुंदवली ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ यांना जोडण्यासाठी उभारण्यात येत आहे. आज याच मार्गिकेसाठी जे 1.6 किमीचे भूमिगत बोगदे खणण्यात येत आहेत. त्यापैकी एक बोगदा (Metro Tunnel) आज खोदून पूर्ण होत आहे. दिशा नावाची टनेल बोरिंग मशिनने हा संपूर्ण बोगदा खणला. याच कामाची पाहणी करण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित आहेत.